माझ्या मना दुख करू नको हे/
मना नेहमी शोक धरू नको हे//
झाले गेले सर्व सोडून द्यावे/
सदा सुखी जीवन व्यतीत करावे//१//
माझ्या मना सदा हसत जगावे/
मनी चिंता कधी नाही बाळगावी//
जीवन असे तोवर निश्चिंत राहावे/
सदा सर्वदा प्रेमाने बोलावे//२//
माझ्या मना देव पूजित जावे/
देवाने दिला देह त्याचाच मानावे//
पाषाणात हि देव हे ध्यानी धरावे/
देवा कधी नाही विसरावे//३//
माझ्या मना सदा शांत राहावे/
कधी आपला तोल जाऊ न द्यावे//
देहाला सदा ताब्यात ठेवावे/
रागाला सदा आवर घालावे//४//
माझ्या मना नेहमी मौन पाळावे/
नसे शक्य कमी तरी बोलावे//
माझ्या मना काही तरी करावे/
नसे शक्य नकार देत जावे//५//
(क्रमशः)


























buddy if you could put a tag regarding the language in which the poem is written it really helps
Hi Rahul, Its my poem in local language. i.e. Marathi language of Maharashtra.